वैराग! मिठाईचे दुकान टाकण्यासाठी २० लाख आण म्हणून विवाहितेचा छळ; पतीसह ६ जणांवर वैराग पोलिसात गुन्हा दाखलउस्मानाबाद मध्ये खाव्याची भट्टी व मिठाईचे दुकान टाकण्यासाठी वीस लाख आण म्हणून विवाहितेचा जात हट्ट केल्याप्रकरणी पतीसह सहा जणांवर वैराग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या विषयी सविस्तर वृत्त असे की, आशिता दगडू जाधवर (वय 21) रा. वडजी ता. वाशी जि. उस्मानाबाद सध्या रा. भालगाव ता. बार्शी जि. सोलापूर तिने दिलेल्या फिर्यादीनुसार पती दगडू माणिक जाधवर, सासू सीता माणिक जाधवर, सासरे माणिक चांगदेव जाधवर, दीर अशोक माणिक जाधवर, जाऊ आयोध्या अशोक जाधवर व ननंद पूनम माणिक जाधवर सर्वजण राहणार वडजी जिल्हा उस्मानाबाद यांच्या विरोधात सोमवारी वैराग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी अशिता यांचा विवाह दगडू जाधव यांच्यासोबत 31 मे 2019 रोजी झाला होता, पतीला खव्याचा व्यवसाय उस्मानाबाद येथे सुरू करण्यासाठी सासरकडील लोक माहेरून सतत पैशाची मागणी करू लागले त्यानंतर त्यांना घरची परिस्थिती हलाखीची असल्याचे सांगितले. त्यानंतरही दीर नणंद सासू-सासरे सर्वजण संगनमताने शारीरिक मानसिक त्रास देऊन मारहाण करून छळ करत होते, पतीनेही तिला माहेरी आणून सोडले. त्यानंतर विवाहित आहे माहेरी भालगाव राहत होती. त्यांनी वैराग पोलिसात जाऊन फिर्याद दिली आहे त्यानुसार भादवि कलम 323, 34, 498 A, 504 व 506 कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments