बार्शी :
येथील टपाल कार्यालयातील तत्कालीन डाक सहाय्यक,
बाळासाहेब विष्णू लोखंडे यांनी दि. १० डिसेंबर २०१३ ते १२ सप्टेंबर २०१४ या कालावधीत प्रत्येकी ३७९० रुपये किंमतीचे २ सीओडी पार्सलची नोंद पार्सल नोंदवहीत न करता, सूचनापत्र पोस्टमनकडून पत्ताधारकांस दिले.
त्या पत्ताधारकांनी ती पार्सले रक्कम देऊन सोडविली. ते ७५८० रुपये सरकार जमा न करता, बाळासाहेब लोखंडे यांनी वैयक्तिक कारणांसाठी वापरुन सरकारी रकमेचा अपहार केला, तसेच सदरची पार्सले वाटप केल्याची सूचनापत्रे व कार्यालयीन नोंदी लोखंडे यांनी नष्ट केल्या. अशी फिर्याद राहुल विनायक जाधव (वय ३२) उपविभागीय डाक निरिक्षक, बार्शी उपविभाग यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार गुन्हा नोंद झाला आहे.
0 Comments