रविवारी ५ः३० वाजण्याच्या सुमारास मुरारजी पेठ येथील एका युवकाने घरातच गळफास घेतल्याची घटना उघङकीस आली.या घटनेन परिसरात एकच खळबळ माजली असून या आत्महत्ये पाठीमागचे नेमके कारण काय?हे आणखी स्पष्ट कळाले नसून फौजदार चावङी पोलिसांना घटनेची माहीती मिळताच पोलिसही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.रितेश राजेंद्र परदेशी रा.मुरारजी पेठ कल्पना टाॕकीजच्या पाठीमागे वय वर्षे ३५ अशी माहिती तपासात निष्पन्न झाली असून संबंधित युवकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हील हाॕस्पिटलला पाठवण्यात आला असून या घटनेचा तपास आता पोलिसांकङून जलदगतीने सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे.
0 Comments