करमाळा तालुक्यातील एका गावामध्ये येथे १३ वर्षाच्या मुलीस अज्ञात व्यक्तीने फुस लावुन पळवून नेले आहे. या घटनेमुळे केम येथे खळबळ उडाली आहे. हि घटना २० जूनला सकाळी नऊ वाजता घडली आहे. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी करमाळा पोलीसात फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे कि, माझी मुलगी १३ वर्षाची आठवी मध्ये शिकत आहे.
हि बहिणीकडे गेल्या १५ दिवसांपासून केम येथे गेली होती. २० जूनला सकाळी नऊच्या सुमारास ती घरातून बाहेर गेली. तीचा शोध लागला नाही, सर्वत्र शोधाशोध करून ती सापडली नाही. त्यावरून तिला अज्ञात व्यक्तीने फुस लावुन फसवून नेले. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.
0 Comments