महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे वर्णी लागणार


 
एकनाथ शिंदे यांनी बंड करत चाळीसहून अधिक आमदार सुरुवातीला सुरत आणि त्यानंतर गुवाहाटीला घेऊन जात बंड केला. त्यामुळं राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं होतं आणि या सगळ्या राजकीय नाट्यानंतर काल राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी आज ३० जून रोजी फ्लोर टेस्ट करण्याचे निर्देश दिले. राज्यपालांच्या या निर्णयानंतर महाविकास आघाडी सरकारनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद सुरू २०१९ मध्ये शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती केली आणि भाजपला बाहेर ठेवलं. जनतेने महाविकासआघाडीला मत दिले नव्हते. शिवसेना भाजप युतीला दिले होते. महाविकास आघाडीच्या कामात प्रचंड भ्रष्टाचार आपल्याला पहायला मिळाला. दोन मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये जाणं हे खूप खेदजनक आहे.

एकीकडे बाळासाहेबांनी दाऊदचा विरोध केला आणि दुसरीकडे त्याच्याशी संबंधित मंत्री जेलमध्ये जातो. शेवटच्या दिवशी औरंगाबादचं संभाजीनगर झालं पण त्याचा निर्णय येणार्या सरकारला पुन्हा घ्यावे लागतील. ठाकरे सरकारने कॅबिनेटचं पत्र आल्यानंतर निर्णय घेतले. पण त्यावर फेरविचार करावे लागतील. शिवसेना नेत्यांची महाविकास आघाडीत कुचंबना झाली. हारलेल्या विरोधकांना निधी दिला गेला पण शिवसेनच्या नेत्यांना निधी नव्हता. एकनाथ शिंदे यांचा गट आमच्या सोबत आला आहे. अजूनही अपक्ष आमच्यासोबत आले आहेत. याबाबतचं पत्र आम्ही राज्यपालांना देणार. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील.

Post a Comment

0 Comments