सोलापूर(Solapu)! आईसह दोन मुलांचा विहीरीत बुडून मृत्यू


सोलापूर/प्रतिनिधी:

 एका महिलेने आपल्या दोन चिमुकल्यासह आत्महत्या केल्याची घटना समोर आली  आहे. विहीरीत उडी मारुन ही आत्महत्या केल्याचे समोर आले  आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सदर घटना ही उत्तर सोलापूर तालुक्यातील आलेगाव येथे घडली. याप्रकरणी वळसंग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोनाली सिद्राम चोपडे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. संतोष सिद्राम चोपडे (वय ८ वर्ष), संदीप चोपडे (वय ५, वर्ष सर्व राहणार तिल्हेहाळ, आलेगाव शिवार, तालुका-दक्षिण सोलापूर) असे दोन्ही मुलांचे नाव आहेत. आईने या आपल्या दोन मुलांसह आलेगाव येथील शिवारातील शेत गट नंबर ३०/२ चे मालक दयानंद वसंत शिंदे यांचे शेतातील विहिरीत उडी घेतली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी सकाळी तिन्ही मृतदेह विहीरीतील पाण्यावर तंरगताना आढळून आल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

एका आईने आपल्या दोन मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली असल्याची शक्यता वळसंग पोलिसांनी वर्तवली आहे. याबाबत अधिक माहिती देताना पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी सांगितले की, प्राथमिक माहितीनुसार ही आत्महत्या आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती दिली.

Post a Comment

0 Comments