मोहोळ! शेततळ्यात पडून तीन बालकाचा मृत्यू ,शेटफळ गावावर शोककळा


मोहोळ/प्रतिनिधी:

मोहोळ तालुक्यातील शेटफळ येथे अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून शेततळ्याजवळ खेळत असताना दोन सख्या भावांसह एका मित्राचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे . ही तिन्ही चिमुरडी अवघ्या ७ ते ८ वर्षांची होती. या घटनेमुळे शेटफळ गावासह मोहोळ तालुक्यावर दुःखाची शोककळा पसरली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहोळ तालुक्यातील शेटफळ येथील शेततळ्यात ही घटना घडली आहे. शेततळ्यामध्ये २ सख्या भावांसोबत त्यांच्या लहान मित्राचाही मृत्यू झाला. शेततळ्याकडे गेलेल्या या तीन चिमुकल्यांचा शेततळ्यात पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ४ ते ५ वाजेच्या सुमारास घटना घडली. कार्तिक मुकेश हिंगमिरे (वय ७) आणि सिद्धेश्वर भरत निकम (वय ७ वर्ष), विनायक भरत निकम (८) अशी मृत मुलांची नाव आहे.  सिद्धेश्वर आणि विनायक हे दोघेही सख्खे भाऊ आहे.


मुकेश हिंगमिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, मुकेश हे चालक म्हणून पुणे येथे काम करतात. त्यांची बहीण रेश्मा भरत निकम व त्यांचे पती भरत निकम हे मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथे राहतात मात्र दोघेही पती-पत्नी कामानिमित्ताने शेटफळ येथील महेश डोंगरे यांच्या शेतात शेत मजूर म्हणून काम करतात. रेश्मा आणि भरत निकम यांना सिद्धार्थ आणि विनायक अशी दोन मुले आहे तर मुकेश हिंगमिरे यांना कार्तिक नावाचा मुलगा आहे.

नऊ मे रोजी सकाळच्या सुमारास मुकेश यांनी कार्तिक यास खेळण्यासाठी बहिण रश्मी निकम हिच्याकडे सोडले होते. दुपारच्या सुमारास बहीण रेश्मा निकम ही कामानिमित्ताने बाहेर गेली होती. त्यावेळी घरात सिद्धार्थ विनायक आणि कार्तिक तिघेजण खेळत होते. मात्र रेश्मा या पाच वाजता घरी आल्यानंतर त्यांना मुले कुठेही दिसली नाही. शोधा शोध घेतला असता कुठे आढळून आले नाहीत त्यांनी भाऊ मुकेश याला कॉल करू मुले कुठे दिसत नसल्याचे सांगितले.

Post a Comment

0 Comments