कंगना रनौत ही तिच्या आक्रमक कारणासाठी प्रसिद्ध असणारी अभिनेत्री आहे. तिला सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांची संख्याही सर्वाधिक आहे. कुणीही काही बोललं तर अरेला का रे करणाऱ्यांमध्ये कंगनाचा क्रमांक सगळ्यात वरचा आहे,. तिनं आतापर्यत बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींशी पंगा घेतला आहे. सध्या तिचा जावेद अख्तर यांच्यातील वाद कोर्टापर्यत येऊन पोहचला आहे. कंगनाचा तीन दिवसांपूर्वी धाकड चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. आता त्यातील गाणे व्हायरल झाले आहे. यासगळ्यात कंगनाच्या लग्नाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. एका अभिनेत्यानं कंगनासाठी मुलगा पाहण्याची जबाबदारी घेतो असे सांगुन अनेकांना धक्का दिला आहे.
दुसरीकडे कंगनाची एक प्रतिक्रिया सोशल मीडियावरुन व्हायरल झाली आहे. त्यामध्ये कंगना म्हणते, गेल्या काही वर्षांपासून माझ्याबाबत वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा पसरवल्या गेल्या आहेत. माझे लग्न का होत नाही याचे कारण माझा आक्रमक स्वभाव, मी वाट्टेल तशी बोलले, मी रागीट आहे, याशिवाय मी मुलांना मारते अशा काही अफवांमुळे माझं लग्न होत नाही असं माझ्याबद्दल बोलंल जातं. असं कंगनाचं म्हणणं आहे. यासगळ्यामुळे माझं लग्न होतं नाही. असे अनेकांना वाटते. पण हे खोटं आहे. कृपया करुन लोकांनी माझ्या लग्नाविषयी अफवा पसरवणे बंद करावे. असे आवाहन कंगनानं केलं आहे.
एका मुलाखतीमध्ये कंगनानं सांगितलं की, माझं अजुनपर्यत लग्न का झालं नाही याचं कारण म्हणजे मी मुलांना मारते. आता या कारणामध्ये काहीही तर्क नाही. कुणी काहीही बोलतं. लोकं त्यावर विश्वासही ठेवतात. यासाऱ्याचा परिणाम संबंधित व्यक्तीवर काय होत असेल याचा जराही विचार कुणी करायला मागत नाही. अशा शब्दांत कंगनानं आपली खंतही व्यक्त केली आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार कंगनानं बिग बी अमिताभ बच्चन यांच्याशी पंगा घेतला आहे. त्यांनी कंगनाच्या धाकड चित्रपटातील गाण्यावर सोशल मीडियावर व्टिट केले होते. मात्र ते तातडीनं डिलिटही केले.
धाकडच्या निमित्तानं घेण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये आगामी काळातील त्याच्या प्लॅन्सविषयी सांगितलं आहे. त्यामध्ये कंगनानं आपल्या लग्नाविषयी आतापर्यत वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा पसरवल्या गेल्या. त्याचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर होत असल्याचे कंगनानं सांगितलं आहे.
0 Comments