दिल्लीतील जहांगीरपुरी येथे धार्मिक दंगल भडकली होती. हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर दगडफेक झाली होती त्यानंतर त्या भागात तणावाचे वातावरण होते. आता हिंसाचारातील मुख्य सुत्रधार तबरेज उर्फ चिठ्ठा ला पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे हिंसाचारानंतर निघालेल्या शांतता आणि तिरंगा यात्रेत तो सर्वात पुढे होता. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर असताना झालेल्या दिल्ली दंगलीतही मुख्य आरोपी म्हणून तबरेजचे नाव आले आहे.
पोलिसांनी तबरेजसोबत अन्य दोन आरोपींना अटक केली असून अनाबुल आणि जलील अशी त्यांची नावे आहेत. जहांगीरपुरीमध्ये झालेल्या दगडफेकीत तबरेज खूप सक्रिय होता, इतकेच नव्हे, तर पोलीसांच्या पत्रकार परिषदेवेळी तो उपायुक्तांच्या शेजारच्या खुर्चीवर बसला होता, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
0 Comments