बार्शी - येथील बी.पी. सुलाखे कॉमर्स कॉलेजमधील इयत्ता अकरावीतील विद्यार्थी संस्कार यतीशकुमार गायकवाड याने नेपाळ येथे झालेल्या इंडो-नेपाळ रोलर स्केटिंग इंटरनॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत एक गोल्ड व एक सिल्वर पदक जिंकून उज्वल यश मिळवले. या स्पर्धेमध्ये अनेक देशांमधील स्केटिंग स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धेसाठी कोच प्रियांका येडलवार व सचिन गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.
स्केटिंग क्षेत्रातील उल्लेखनीय यशाबद्दल स्पोर्ट्स रिव्हॉल्युशन ऑफ इंडियाच्या वतीने संस्कारला यापूर्वीही सन २०१९ मध्ये भारतीय खेल पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
0 Comments