लाच घेताना सहायक पोलीस निरीक्षकाला रंगेहात पकडले



लाचखोरीत महसूल व पोलीस दल आघाडीवर आहे हे निरनिराळ्या सर्व्हेतून समोर येतच आहे. असाच प्रकार ठाणे जिल्ह्यातील एका पोलिस स्टेशन अंतर्गत घडून आला. काशीमीरा पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र भांबरे यांना २५हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस ठाण्यातच रंगेहात अटक केली आहे.

तक्रारदारावर दीड वर्षांपूर्वी ३७६ चा गुन्हा काशीमीरा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात दोषाआरोप न्यायालयात सादर करायचे आहे. आपण मला फ्लॅट, पैसे द्या, अशी मागणी पोलीस अधिकारी महेंद्र भांबरे यांनी तक्रारदाराकडे केली होती. याबाबत तक्रारदारांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. गुरुवारी सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात २५ हजार घेताना ताब्यात घेतले आहे.

Post a Comment

0 Comments