बार्शी! ग्रामपंचायत चौकशी व ग्रामसेवक यांचेवर कारवाई करावी म्हणून बार्शी पंचायत समिती समोर बेमुदत धरणे आंदोलन


 बार्शी/ प्रतिनिधी:
                   
बार्शी तालुक्यातील श्रीपत पिंपरी येथील ग्रामपंचायत मध्ये झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी व ग्रामसेवक पी. बी.बाविस्कर यांच्याविरोधात तक्रार केकेल्या  आहेत याची आजपर्यंत कौकशी झालेली नाही.माहिती अधिकार अर्जामध्ये उत्तरे दिलेली नाहीत, प्रथमअपिलाच्या दिवशी उपस्थित राहिलेले नाही,अपिलीय अधिकारी यांनी माहिती देण्याचे आदेश देऊन देखील माहिती दिलेली नाही ग्रामपंचायत चा लेखाजोगा गेल्या 8 ते9 वर्षापासून पूर्ण केलेला नाही! म्हणून वारंवार तक्रारी केलेल्या होत्या. संदर्भित विषयात गटविकास अधिकारी श्री शेखर सावंत यांना व वरिष्ठ अधिकारी यांना ही भेटून वारंवार सांगितले होते परंतु , त्यांनी देखील तक्रारीवर कोणतीही कारवाई केलेली नाही.म्हणून १ मे महाराष्ट्र दिना दिवशी कर्यालाईन वेळेत बेमुदत धरणे आंदोलन करणार आहे.असे निवेदन दिनांक : 13/04/2022 रोजी निवेदन दिलेले होते त्याप्रमाणे मी आज आंदोलनास सुरुवात केलेली आहे.  
               
यात गटविकास अधिकारी यांना वारंवार सांगून त्यांनी देखील कारवाई केलेली नाही, म्हणजेच त्यांनी सुधा शासन परिपत्रक 4 जानेवारी 2017 चे उल्लंघन केलेले आहे.तसेच या प्रकरणाची चौकशी तात्काळ करण्यात यावी व ग्रामसेवक व सबंधित अधिकारी व कर्मचारी आणि पदाधिकारी यांचेवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा हे आंदोलन तीव्र स्वरूपात केले जाईल असे दयानंद पिंगळे यांनी बोलताना सांगितले.

Post a Comment

0 Comments