सांगली : सांगली जिल्ह्यातील मिरज-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर चारचाकी आणि बुलेट अपघातात बुलेटस्वार पोलिसाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, या भीषण अपघातात चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. महामार्गावरील शिरढोन जवळ हा अपघात झाला आहे.
कवठेमहांकाळ येथील चार चाकी वाहनाची बुलेट मोटरसायकलला जोराची धडक बसल्याने झालेल्या अपघातात प्रवीण बाबाराम सोनवणे (वय ४३) या पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. आज दुपारच्या सुमारास हा अपघात झाला आहे. अपघाताची नोंद कवठेमहांकाळ पोलिसात झाली आहे.
प्रवीण सोनवणे हे बुलेट मोटरसायकलवरून सांगोल्याहून सांगलीकडे निघाले होते. तर चार चाकी वाहन मिरज हून सोलापूर कडे निघाले होते. दरम्यान, उत्तम सिमेंट कारखाना जवळ असलेल्या पुलावर आले असता समोरून येणाऱ्या बुलेट मोटर सायकलला चारचाकी वाहनांची जोराची धडक बसली. यात प्रवीण सोनवणे यांना डोक्याला आणि पायाला जोराचा मार लागल्याने जागीच ठार झाले. तर, जखमींवर कवठेमहांकाळ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
0 Comments