भावाने दोन सख्ख्या अल्पवयीन बहिणींवर केला बलात्कार ; आईवरही बलात्काराचा प्रयत्नजिल्ह्यात संतापजनक अशी बातमी समोर आली आहे. जिथे एका भावाने आपल्या दोन सख्ख्या बहिणींना वासनेची शिकार बनवून  आईवरही बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. एफआयआर दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली  आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गॅरेज दुरुस्तीचे काम करणाऱ्या तरुणाने हा प्रकार केला.

लोहरदगा शहरी भागातील रहिवासी असलेल्या या नराधम भावाला महिला ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर पॉक्सो कायद्यान्वये आणि बलात्काराच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने आपल्या दोन सख्ख्या बहिणींवर बलात्कार केला आहे. यानंतर त्याने आईलाही वासनेची शिकार बनवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याच्या आईने महिला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली.

गेल्या तीन वर्षांत आरोपीने त्याच्या दोन अल्पवयीन बहिणींवर अनेकदा बलात्कार केला आहे. दरम्यान, त्याने पुन्हा एकदा आपल्या बहिणीला बलात्काराची शिकार बनवण्याचा प्रयत्न केला असता पीडितेने विरोध केला. यासोबतच पीडितेने तिच्या आईलाही याबाबत माहिती दिली. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

Post a Comment

0 Comments