भूम तालुक्यातील पाथरूड परिसरात ऊस तोडणी करत असलेल्या चार मजुरावर बिबट्या सदृश प्राण्याने हल्ला केल्याने मजूर गंभीर जखमी झाले असून पाथरूड परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बागवडी तलाव परिसरात ऊसाची तोडणी करत असताना शुक्रवार (दि२९) रोजी अचानक ऊसाच्या फडातून बिबट्या सदृश प्राण्याने ऊस तोड मजुरावर हल्ला करून चावा घेतल्याने चार मजूर गंभीर जखमी झाले आहेत.
पाथरूड परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. उन्हाचा कडाका प्रचंड वाढल्याने पाण्याच्या शोधात वन्यप्राणी फिरत असतात अनेक वन्यप्राणी हे तलाव परिसरात व मानवी वस्ती कडे ही पाहायला मिळतात. बिबट्या सदृश्य हल्यात जखमी झालेल्या ची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी रोहिणी नरे, नायब तहसीलदार प्रमोद सावंत, वन परिक्षेत्र अधिकारी आर. पी सिंगारे, वणपाल एल डी घांधले यांनी तत्काळ पाथरूड परिसरात घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करून बिबट्या सदृश्य प्राण्याचा शोध लावण्यासाठी उपाययोजना करत आहे.
0 Comments