शारीरीक संबंधाचे चित्रण करून महिलेची बदनामी करणारा अटकेत



लग्नाच्या अमिषाने शारीरीक संबंध ठेवून त्याचे चित्रण  करीत पहिल्या पतीला पाठवून महिलेची बदनामी करणाऱ्याला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. दीपक मच्छिंद्र रणदिवे (वय ३४, रा. मार्गोसा सोसायटी, महंमदवाडी, वानवडी) याला अटक केली आहे. याप्रकरणी एका वानवडीतील २६ वर्षाच्या महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी यांचे पहिले लग्न झाले होते. गेल्या काही वर्षांपासून फिर्यादी यांचे दीपक रणदिवे याच्याशी संबंध होते. दीपक याने त्यांना लग्नाचे आमिष दाखवून १५ एप्रिल २०१९ रोजी वडकीनाला येथील हॉटेलमध्ये नेले. तेथे त्यांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांच्याबरोबर शारीरीक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना घेऊन जाऊन त्यांच्याबरोबर शारीरीक संबंध ठेवले.

यादरम्यानच्या काळात फिर्यादी यांच्या नकळत त्याने फिर्यादी यांचे अर्धनग्न अवस्थेतील फोटो व व्हिडिओ काढले होते. फिर्यादी यांनी लग्नाविषयी विचारले असता त्याने लग्नास नकार दिला. तसेच नकळत काढलेले फोटो व व्हिडिओ त्याने फिर्यादी यांच्या पहिल्या पतीला पाठवून त्यांची बदनामी केली. ते व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यामुळे त्यांनी घाबरुन पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे.

 

Post a Comment

0 Comments