पंढरपूर - विठ्ठलाचे दर्शन घेऊन घरी परत जाताना भाविकांच्या वाहनास झालेल्या अपघात दोन जण ठार तर चार जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक मिळत आहे. एसटी व चार चाकी यांच्यात पंढरपूर जवळील देगाव परिसरात अपघात झाला. हा अपघात झाल्याचे समजताच परिसरातील नागरिक मदतीसाठी घटनास्थळी धावले.
या अपघाताबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी;पंढरपूरहुन सोलापूरकडे जात असताना भाविकांच्या चार चाकी (एमएच ११ बीव्ही १९४२) वाहनास समोरून येणाऱ्या उस्मानाबाद आगाराच्या एसटी बसने जोरदार धडक दिली.
यामध्ये चार चाकीमधील दाेघांचा जागेवरच मृत्यू झाला. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पंढरपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
0 Comments