सोलापूर! पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते ईडीच्या रडारवर..?



सोलापूर/प्रतिनिधी:

सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांच्या विरोधात  बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आवाज उठवला आहे. सातपुते या अवैध धंद्यांना मदत करुन हप्तै गोळा करतात आणि आपल्या अधिकाराचा गैरवापर करून गुन्हेगारांना पाठीशी घालतात. तसेच गुन्हेगारांच्या विरोधात तक्रार करणाऱ्यावरच खोटे गुन्हे दाखल करण्याची भीती घालून त्रास देतात, असे आरोप केले. त्यांच्यामुळे सोलापूर ग्रामीणमध्ये अवैध दारू, गुटखा, वाळू तस्करीचे प्रमाण वाढून गुन्हेगारी वाढली आहे. 

म्हणून याला जबाबदार असलेल्या सोलापूर पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांची चौकशी करुन कारवाई करावी, असे विधिमंडळ अध्यक्षांच्या पुढे प्रश्न उपस्थित करून लेखी तक्रार केली आहे. तेजस्विनी सातपुते यांच्यावरील आरोपांमुळे सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. नैतिकदृष्ट्या गैरवर्तणूक, सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे असलेली तक्रार  सोलापूर ग्रामीणच्या पोलीसा अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांच्या विरोधात राजेंद्र राऊत आक्रमक झाल्याने खळबळ माजली आहे.

आमदार राऊत यांनी विधिमंडळात प्रश्न उपस्थित करताना म्हणाले, सोलापूर पोलीस अधीक्षक सातपुते या अवैध धंदे करणाऱ्यांना मदत करत आहे. आपल्या अधिकाराचा गैरवापर करून गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे यासंदर्भातील लेखी तक्रार आ. राऊत यांनी केली आहे तसेच सातारा जिल्ह्यात कार्यरत असताना पोलीस अधिक्षक सातपुते यांनी कराड येथील एका सर्वसामान्य व्यक्ती वर खोटा गुन्हा दाखल केला होता का व्यापार्‍यावर मोक्कांतर्गत कारवाई केली होती मात्र तडजोड करून ही कारवाई मागे घेण्याचा आरोपही त्यांनी केला. सातपुते यांच्या विरोधात न्यायालयासह महाराष्ट्र राज्य पोलीस प्राधिकरण यांच्या न्यायालयात सुद्धा केस सुरू आहेत. अशा अधिकाऱ्यांना पोलीस दलातून काढून टाकून त्यांच्या कारकिर्दीची ईडी किंवा सीबीआय मार्फत चौकशी करण्याची सोशल मीडियावर मागणीही त्यांनी केली.

Post a Comment

0 Comments