पंढरपूर! पुरुष जातीचे अर्भक रस्त्यावर टाकून पायलन, पोलिसांना तपासात धक्कादायक सत्य समोरपंढरपूर/प्रतिनिधि:

पंढरपूर तालुक्यात नुकत्याच जन्मलेल्या पुरुष जातीचे बाळ रस्त्यावर सोडून अज्ञात निघून गेले होते. मात्र रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्या बाळाला हॉस्पिटल मध्ये घेऊन त्याचा जीव वाचवला. त्यानंतर सदर पोलिसांना या प्रकरणात माहिती देण्यात आली. पोलिसांनी तपास केला असता पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याचबरोबर अल्पवयीन मुलींनी या बाळाला जन्म दिला होता सदर मुलीवर अत्याचार करणाऱ्या दोघा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.


पंढरपूर तालुक्यातील फुल चिंचोली येथे देवदर्शनासाठी निघालेल्या अविनाश वसेकर (वय 32) हे आपल्या कुटुंबासह शनिवारी रात्री निघाले होते मात्र त्यांना रस्त्यातच नुकतेच जन्मलेले पुरुष जातीचे बाळ आढळून आले. मात्र सदर बाळाजवळ कोणी नसल्यामुळे सदर बाळाला पंढरपूर येथील डॉ. शितल शहा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे त्या बाळाचे प्राणही वाचली. या प्रकरणाची पंढरपूर पोलिसांना माहिती देण्यात आली. मात्र त्यानंतर पोलिसांच्या तपासामध्ये धक्कादायक प्रकार समोर आला.


पंढरपूर तालुका पोलिसांनी अज्ञात विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पंढरपूर तालुका पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असतात सदर मुलीची डिलिव्हरी झाली. ती मुलगी अल्पवयीन असल्याचे पुढे आले. या प्रकरणी लपल्यामुळे आई-वडील यांच्यासह एका रिक्षा वाल्या वर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलीकडे अधिक चौकशी केली असता. तिच्यावर तिघेजनाणीं अत्याचार केल्याचे समोर आले. किरण दावणे व दत्ता खरे असे दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. तिसरा व्यक्तीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांनी दिली आहे. पुरुष जातीच्या बाळाचा वडील कोण याची तपासणी करण्यासाठी दोघांचेही डीएनए तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

Post a Comment

0 Comments