सोलापूर-सोलापूर-अक्कलकोट-गाणगापूर महामार्गावर कर्नाटक हद्दीत बळुरगी गावाजवळ भरधाव कार झाडावर आदळली.या अपघातात कारमधील चार महिला व चालक जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. दोन जण गंभीर जख्मी झाले.ल आहेत. शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. अपघात एवढा भीषण होता की, पाचही जण जागेवरच ठार झाले आहेत. याची अफझलपूर(जि गुलबर्गा,कर्नाटक) पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री पर्यंत सुरु आहे.
अहमदनगरचे चार जण मृत आणि दोघे जखमी-
बाबासाहेब सखाराम वीर, कोमल बाबासाहेब वीर, राणी बाबासाहेब वीर, अणव हिराबाई, छाया बाबासाहेब वीर यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर साहिली बाबासाहेब वीर, चैत्राली दिनकरा सुरवशी हे दोघे गंभीर जख्मी झाले आहेत.
मंदिरांचे दर्शन घेऊन परत अहमदनगरकडे जाताना झाला अपघात-
कारमधील सर्वजण कर्नाटकातील प्रसिध्द दत्त मंदिर गाणगापूर येथे दर्शन करून अक्कलकोट मार्गे अहमदनगर कडे जात होते.अपघातातील पाचजण मृत झाल्याने व दोन जण गंभीर जख्मी असल्याने अहमदनगर वरून नातेवाईक निघाले आहेत. ते आल्यावरच रात्री उशिरा फिर्याद दाखल होईल अशी माहिती अफझलपूरचे पीएसआय विश्वनाथ मुदरेड्डी यांनी दिली. सर्व प्रवाशी अहमदनगरचे असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
0 Comments