बीडच्या कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत महिला आमदारच सुरक्षित नसल्याचे सांगून आ. नमिता मुंदडांनी परवाच अधिवेशनात आपबिती सांगितली होती. पाठोपाठ आज त्या आपबितीतील व्हिडिओ व्हायरल झाले असून सेल्फीचा आग्रह धरणार्या व्यक्तीला त्यादिवशी बेदम मारहाण झाल्याचे या व्हिडिओत दिसून येत आहे.
त्याचबरोबर आ. नमिता मुंदडांचे सासरे नंदकिशोर मुंदडा यांनी व्यक्तीचे गचुरे धरल्याचे दिसते. त्याचबरोबर मुंदडांच्या हातात काठी असल्याचेही स्पष्ट पहावयास मिळत असून नंदकिशोर मुंदडा हे संबंधित व्यक्तीला शिवीगाळ करत असल्याचे या व्हिडिओमधून समोर आले आहे. सदरचा व्हिडिओ हा प्रचंड व्हायरल होत असून लोकप्रतिनिधीचे सासरे काठी हातात घेऊन कायदा व सुव्यवस्था राखतात का? असा सवाल सोशल मीडियावर विचारला जात आहे.
गेल्या काही दिवसांपुर्वी आमदार नमिता मुंदडा या आपल्या परिवार व लहान मुलासह बाहेर रसवंतीवर रस पिण्यासाठी गेल्या होत्या.
त्यावेळी त्या ठिकाणी दोन ते तीन व्यक्ती आले, आ. मुंदडांसोबत सेल्फी घेण्याचा आग्रह केला म्हणून त्या ठिकाणी वाद होत संबंधित व्यक्तींनी तोडफोड, दगडफेक केल्याच सांगून दोषींवर गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी परवा विधानसभेमध्ये आ. मुंदडांनी लक्षवेधी मांडत बीडमध्ये कायदा व सुव्यवस्था प्रचंड बिघडल्याचे सांगून स्वत: वरची आपबिती विधानसभेत मांडत ‘इथे लोकप्रतिनिधी सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? ’ असा सवाल सरकारला विचारला होता. त्यापाठोपाठ आज घटना घडली त्या दिवशीचे व्हिडिओ सोशल माध्यमातून प्रचंड व्हायरल होत आहे. सेल्फीचा अट्टाहास धरणार्या व्यक्तीला बेदम मारहाण झाल्याचे दिसून येते. त्याचे कपडे फाडून त्याला अर्धनग्न केल्याचेही व्हिडिओमध्ये दिसते तर एवढेच नाही तर आ. नमिता मुंदडांचे सासरे नंदकिशोर मुंदडा हे त्या व्यक्तीचे गचुरे धरत शिवीगाल करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येते. पुढे नंदकिशोर मुंदडा हे हातात काठी घेऊन दिसून येत असल्याने लक्षवेधीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करणार्या आ. नमिता मुंदडा यांचे सासरे नंदकिशोर मुंदडा हातात काठी घेऊन कायदा व सुव्यवस्था राखतात का? असा सवाल सोशल मिडियाच्या माध्यमातून विचारला जात आहे.
0 Comments