वैराग! बेवारस मृत व्यक्तीवर पोलिसांनी आणि नगरपंचायत येथील कर्मचाऱ्यांनी मिळून केले अंत्यसंस्कार


 
दिनांक 20 मार्च रविवार रोजी सायंकाळी सात च्या सुमारास बार्शी तालुक्यातील वैराग जवळील मालेगाव च्या शिवारात निवृत्ती घोडके यांच्या शेतात बोरीच्या झाडाखाली एक इसम मयत झाला असल्याची खबर वैराग पोलिसांना मिळाली होती.
त्यानंतर वैराग पोलिसांनी तेथील घटनास्थळी धाव घेऊन सदर मयत व्यक्तीला ताब्यात घेऊन वैराग येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आणले होते. दोन दिवस वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक महारुद्र परजने यांनी सदर मयत इसमाच्या नातेवाईकांचा तपास करण्याची मोहीम सुरू केली परंतु त्या मयत इसमाचे कोणीही नातेवाईक आढळून न आल्याने वैराग पोलीसानी 22 मार्च रोजी मयत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला.

त्यांनी वैराग येथील नगरपंचायत कर्मचारी विलास मस्के यांना बोलवून सदर व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला व त्या व्यक्तीला वैराग पोलिसांनी आणि नगरपंचायत येथील सर्व कर्मचारी बांधवांनी  लाडोळे वेस वैराग येथील स्मशान भूमी मध्ये अंत्यसंस्कार करण्याचे ठरिवले.

वैराग पोलीस स्टेशन चे पोलिस उपनिरीक्षक महारुद्र परजनें,आण्णासाहेब जाधव,पांडू चव्हाण,सामाजिक कार्यकर्ता शाहरुख बागवान,नगरपंचायत कर्मचारी विलास मस्के,रामभाऊ जाधव,आण्णा जगताप.स्वप्नील चौढरी,पांडुरंग चव्हाण,रवींद्र जाधव,चंद्रकांत सुर्यवंशी,बबलू मणियार
तसेच वैराग पोलीस स्टेशन चे सर्व पोलीस कर्मचारी व नगरपंचायत चे कर्मचारी त्याठिकाणी हजर होते,

Post a Comment

0 Comments