वैराग येथील विजय न्यूज चॅनलचे उपसंपादक शुभम गोवर्धन यांनी विजय न्यूज चॅनलचे सहसंपादक अक्षय बोबडे यांच्या वाढदिवसानिमित्त छान असे आपले मनोगत व्यक्त केले.
भाऊ तुला वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा आपल्या मैत्रीला तोडच नाही निस्वार्थ निष्ठा आणि शांतता हीच आपली ओळख 2016 साल ही आपल्या मैत्रीची पहिली भेट आणि पहिलीच ओळख ठिकाण हॉटेल अमन तरआपले विजय न्यूज चनेलचे संपादक मुज्जमिल कौठाळकर यांच्याच हॉटेल वर आपली सर्वप्रथम पहिली भेट आणि ओळख झाली.
जेव्हा सायंकाळचे 7 वाजले की आपला तो ठरलेला कट्टा अर्थात ठिकाणचं म्हण की.
तुझी ओळख म्हंजे वडापाव वरूनच झाली पण मैत्री वडापाव वरून एवढी घट्ट कधी होईल असा स्वप्नात पण विचार झाला नव्हता जेव्हा 5 रुपयाला वडापाव असायचा आता सुध्दा आहेच पण आधी सारखा नाही तेलाचे सगळ्याच गोष्टीत महागाई झाल्यामुळे वडापाव आता जरी पाच रुपयाला आसला तरी त्याची साईज मात्र बारीक झाली.
असो तुझी आणि माझी ओळख ते विजय न्यूज या चॅनल पर्यंतचा प्रवास हा अविश्वसनीय क्षण आणि संपादक यांच्याशी आपले घट्ट मैत्रीचे नाते आपल्या तिघांची जोडी म्हणजे अमर अकबर अँथनी फिल्म सारखीच जसे विनोद शर्मा,ऋषी कपूर,अमिताभ बच्चन अगदी तशीच आपल्या तिघांची जोडी एवढं मात्र नक्की
आयपीएल आली की तुझी टीम चेन्नई असायची तर माझी आणि मुज्जू भाई यांची मुंबई पण मगील दोन वर्षात असे काही झाले की आपले क्रिकेट मधून पण लक्ष कमी झाले आणि तू तुझ्या संसारात गुंतून गेला कोरोनासारख्या भयंकर महामारीमुळे आपल्याला भेटत सुध्दा येत न्हवत तरी सुद्धा 22 मार्च च्या कडक लॉकडाऊन मध्ये तूझ्या घरी मी दिवस भर आलो होतो त्यानंतर संध्याकाळ च्या दरम्यानच जे काही झालं ते आपल्या दोघांनाच माहिती बरोबर ना.
अखेर जून महिन्यात तुझे लग्न पार पडले कोरोणासारख्या महामारी मुळे तुझे लग्न साध्या पद्धतीत झाले पण खूप उत्साहात झाले तूझ्या लग्नात आम्ही जो काही एन्जॉय करायचे ठरवले होते तो एन्जॉय भलेही झाले नसले तरी तुझे लग्न होऊन तू तूझ्या संसारात गुंतून गेलास.
तरी सुद्धा आपली भेट होतच राहिली कधी चंदू काका च्या अंडा आम्लेट च्या गाड्यावर तर कधी मधला मारुती चौकात अशा विविध ठिकाणी तू नेहमी गावात आलास की मला हक्काने कॉल करत असतं.
पण त्यानंतर पुन्हा एकदा असेच लॉकडाऊन ची परिस्थिती पुन्हा एकदा तेच दिवस आता सर्वकाही सुरळीत सुरू झाले पण तू तुझ्या कामात व्यस्त झाला मी देखील माझ्या कामात व्यस्त झालो आणि मुज्जु भाई देखील त्यांच्या धंद्यात मग्न झाले
तरी देखील महिन्यातून 10 वेळेस तरी न चुकता आता आपल्या दोघांची भेट होतेच असा एक दिवस जात न्हवता की मूज्जू भाई तू आणि मी भेटलो नाहीत किंव्हा निवांत हॉटेलवर त्याच्या गप्पा मारत बसलो नाही पण सध्या आपल्या तिघांच्या देखील हातावर जबाबदारीचे ओझे पडले समज की त्या कारणामुळेच आपण भेटण्यापासून जरी लांब झालो असलो तरी मनातून मात्र नक्कीच जवळ आहे एवढं मात्र नक्की.
सन.2020 विजय न्यूज या आपल्या चॅनल ची आपण सुरुवात केली गणेश जयंतीच्या शुभमुहर्तावर त्याचे सगळे श्रेय आम्ही तुलाच देतो कारण समोर जरी तू नसला तरी.
पड्यामागचा कलाकार तूच आहेस.
तुझ्या त्या सर्व माहिती मुळेच आज आपण विजय न्यूज हे चॅनल सोलापूर जिल्ह्यात न्हवे तर संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय केले.
प्रत्येक वेळी कोणताही स्वार्थ मनात न ठेवता तू विजय न्यूज साठी सदैव आपले सहकार्य केलेस आणि करत देखील आहेस हीच आहे रे आपल्या मैत्रीची खरी ओळख कारण ज्या मैत्रीमध्ये स्वार्थ आला ती मैत्री कधीच टिकाऊ नसते पण आपल्या मैत्रीमध्ये कधी स्वार्थ आलाच नाही म्हणूनच आपण जे काही आहोत आज ते ह्याच गोष्टीमुळे आहोत.
0 Comments