बार्शी! वृध्द महिलेस फसवून १ लाख २० हजाराच्या बांगड्या पलवल्या; अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल


बार्शी/प्रतिनिधी:

सरकारकडून विधवा महिलांना आर्थिक मदत मिळत आहे, असे सांगून बँकेत नेण्याच्या बहाण्याने ८० वर्षाच्या वृध्द महिलेला हातातील सोन्याच्या बांगड्या काढायला लावून फसवणूक केल्याची घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातली गुळओळ रस्त्यावरील पवार लॉन्ड्रीच्या बाजूस, रस्त्यावर बसून, कापडी पिशव्या, बटवे अशी कपड्यांची विक्री करणाऱ्या मथुराबाई हरीभाऊ मिरजकर (वय ८०), रा. बारंगुळे गल्ली, बार्शी यांचेकडे जांभळ्या रंगाची साडी ब्लाऊज घातलेली जाडसर महिला आली. ती त्यांना म्हणाली, आज्जी विधवा बायकांना बँकेत चाळीस हजार रुपये देत आहेत, तुम्हाला पाहिजे असतील तर माझे बरोबर चला. मला पांच हजार रुपये द्या व तुम्ही पस्तीस हजार रुपये घ्या सरकारचे पैसे आहेत.

असे सांगून ढगे मळ्यातील गणपती मंदिराजवळ घेऊन गेल्यावर, बँकेतील साहेबांनी पाटल्या बघितल्या तर आपल्याला पैसे मिळणार नाहीत असे सांगून हातातील चार तोळे वजनाच्या दोन सोन्याच्या पाटल्या (किंमत अं. एक लाख वीस हजार रुपये) काढण्यास सांगून त्या महिलेने एका कागदामध्ये गुंडाळल्या.

असे सांगून ढगे मळ्यातील गणपती मंदिराजवळ घेऊन गेल्यावर, बँकेतील साहेबांनी पाटल्या बघितल्या तर आपल्याला पैसे मिळणार नाहीत असे सांगून हातातील चार तोळे वजनाच्या दोन सोन्याच्या पाटल्या (किंमत अं. एक लाख वीस हजार रुपये) काढण्यास सांगून त्या महिलेने एका कागदामध्ये गुंडाळल्या. कागदात गुंडाळतानाच त्या महिलने हातचलाखी करुन सोन्याच्या पाटल्याऐवजी खोट्या दोन पाटल्या त्या कागदामध्ये गुंडाळून त्यांच्या हातात दिल्या, आणि त्यांचेकडून दोन रुपये घेऊन फॉर्म आणण्याच्या बहाण्याने ती महिला तेथून निघून गेली. बराच वेळ वाट पाहून ती परत न आल्यामुळे कागदांमध्ये गुंडाळलेल्या पाटल्या बघितल्या असता, त्या पाटल्या खोट्या असल्याचे दिसून आले. म्हणून मथुराबाई मिरजकर यांनी फसवणूक झाल्याची तक्रार पोलीसांत दिली आहे. त्यानुसार बार्शी पोलीस ठाण्यात अनोळखी महिलेविरुध्द भा.दं.वि. १८६० कलम ४२० प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

Post a Comment

0 Comments