बार्शी/प्रतिनिधी:
बार्शी शहरातील उपळाई रोड परिसरात बंद घराचा दरवाजा तोडून सुमारे ६० हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना २५ मार्च रोजी उघडकीस आली आहे. या घटनेची फिर्याद बाबासाहेब भोसले रा. व्हनकळस प्लॉट, अलीपूर रोड बार्शी यांनी शहर पोलिसात दाखल केले आहे, त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे तालुक्यातील श्रीपत पिंपरी येथे शेत जमीन आहे त्यानिमित्ताने २३ मार्च रोजी फिर्यादी हे आपला मुलगा व पत्नी यांच्यासह श्रीपत पिंपरी शेताकडे गेले होते. त्यानंतर २५ मार्च रोजी फिर्यादी व त्यांचा मुलगा घरी आल्यानंतर घराचा कडी कोयना तोडल्या दिसला त्यानंतर आज जाऊन पाहणी केली असता सामानही अस्ताव्यस्त पडलेले दिसले, त्यावेळी सुमारे ६० किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने गायब असल्याचे आढळून आले. त्यानुसार त्यांनी शहर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन फिर्याद दिली आहे, या घटनेचा अधिक तपास बार्शी शहर पोलिस करत आहेत.
0 Comments