सोलापूर/प्रतिनिधी:
सोलापूर शहरात केबल वारची ठिणगी पडली आहे.या ठिणगीचे रूपांतर केबल वारचा भडका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.सोलापूर शहरात 1 मार्च रोजी दुपारी एक ते दीड दरम्यान जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत केबल कनेक्शन वरून हाणामारी झाल्याचीघटना घडली आहे.याबाबत पोलीस ठाण्यात तशी नोंद देखील झाली आहे. डेन न्यूज नेटवर्कचे ऑपरेटर राजेश पाटील,सुमित पाटील,अजय देवकर,राहुल गेजगे,आशिष माडेकर,व इतर अनोळखी 10 ते 12 इसमाविरोधात जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशी घडली घटना यासीन महंमदरफिक बोटलीयार (रा. शिवगंगानगर, मजरेवाडी,सोलापूर)यांनी फिर्याद दिली आहे.यासीन बोटलीयार हे मेट्रोकास्ट नेटवर्क इंडिया प्रा.ला.कंपनीचे केबल ऑपरेटर म्हणून काम करतात.1 मार्च रोजी दुपारी 1 ते 1.30दरम्यान जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत काम करत असताना डेन न्युज नेटवर्कचे राजेश पाटील,सुमित पाटील व।त्यांसोबत इतर सहकारी आले.आणि हा केबल एरिया आमचा आहे.इथे दुसऱ्या कंपनीचे केबल कनेक्शन द्यायचे नाही,असे सांगत मारहाण करण्यास सुरुवात केली.यासीन बोटलीयार यांना व त्यांसोबत असलेल्या अनंत हलशेट्टी,रवि पवार यांना देखील लाथा बुक्क्याने मारहाण केली.तसेच पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयीत आरोपीनी फिर्यादी यासिन यांच्या खिशातील3 हजार रुपये रोख रक्कम,50 सेटअप बॉक्स,200 मीटर केबल वायर बंडल हे साहित्य काढून घेऊन गेले.याची नोंद जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पीएसआय ताकभाते करत आहेत.
केबल टोळ्यांमुळे शहरातील शांतता भंग होऊ शकते-
2000च्या दशकात केबलवाला उदयास आला.आणि बघता बघता या नव्या शिताभोवती भूत जमली.लपवाछपवीला उदंड स्कोप आला.केबल व्यवसायातूंन प्रचंड पैसा जमू लागला.बघता बघता केबल टोळ्या सोलापूर शहरात उदयास आल्या आहेत.
‘असतील शितं तर जमतील भुतं', ही म्हण गुन्हेगारी टोळ्यांसाठी चपखल बसते. जिथे बख्खळ कमाई तेथे माफिया टोळ्यांचा शिरकाव झालाच समजा. स्मगलिंग, रियल इस्टेट, ड्रग्ज ही माफियांच्या उपद्व्यापांची परंपरागत क्षेत्रं. पण 2000च्या दशकात गुंडांच्या टोळ्यांना एक नवं क्षेत्र पादाक्रांत करता आलं, ते म्हणजे केबल टीव्हीचं. याचं मुख्य आणि अगदी सहज ओळखता येणारं कारण म्हणजे या धंद्यातली भरभक्कम मार्जिन. येथे मिळणारा नफा तब्बल 80 टक्के एवढा आहे. ज्याच्याकडे जास्त कनेक्शन्स त्याची जास्त कमाई. साहजिकच एरियातली सर्वाधिक कनेक्शन्स आपल्याकडे असावीत म्हणून केबलचालक मनगटशाहीचा वापर करू लागले आहेत. अशात केबलसेवा पुरवणा-या बड्या कंपन्यांमध्येही कमालीची स्पर्धा सुरू झाली आहे. मग काय, केबलचालकांनाही भलताच जोर आला आहे. यामुळे सोलापूर शहराची शांतता भंग होऊ शकते.
0 Comments