रंगपंचमीच्या दिवशी मनसे अन् आ. मिटकरी यांच्यांत अनोखे ट्विटर युद्ध




दाऊदसोबत संबंध असलेल्या पक्षाच्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलण्याचा अधिकार नाही, असा टोला मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांना लगावला आहे. ''जो पक्ष दाऊदच्या माणसांना विमानातून फिरवतो, ज्यांचा मंत्री दाऊदला पैसे पुरवतो, ज्यांचा आदर्शच दाऊद आहे त्या मटणकरींना छत्रपतींबद्दल बोलण्याचा अधिकारच नाही'', असं मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे म्हणाले आहेत. 

राज्यभरात मनसेने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार धुमधडाक्यात साजरी केली. अमित ठाकरेंनी सकाळीच शिवनेरी गडावर हजेरी लावली होती. त्यावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी टीका केली होती. त्यालाच आता मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये ट्विटर वॉर सुरू झाल्याचं दिसून आलं.

Post a Comment

0 Comments