पाकचे पंतप्रधान इम्रान खान राजीनामा देणार?


पाकिस्तानमध्ये सोमवारचा दिवस खूप महत्त्वाचा असणार आहे. पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये आज पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारविरोधात विरोधक अविश्वास प्रस्ताव मांडणार आहेत. दुपारी ४ वाजता सभागृहाचे कामकाज सुरू होईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इम्रान खान  जाणे निश्चित आहे, कारण त्यांना पाकिस्तानी संसदेत बहुमतासाठी 172 खासदारांची गरज आहे, परंतु सुमारे 39 खासदारांनी त्यांना सोडले आहे. मात्र, असे असतानाही इम्रान खान यांच्या राजीनाम्याबाबत सस्पेन्स कायम आहे.

अविश्वास प्रस्तावापूर्वी, पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंट (पीडीएम) या विरोधी पक्षांच्या गटाने सोमवारी इस्लामाबादमध्ये शक्ती प्रदर्शनाची घोषणा केली आहे. जमियत-ए-इस्लाम फझल आणि पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (पीएमएल-एन) देखील पीडीएमच्या शक्ती प्रदर्शनात सहभागी होतील. पीएमएल-एनच्या उपाध्यक्ष मरियम नवाज आणि त्यांचे नातेवाईक हमजा शाहबाज यांनी लाहोरमध्ये मोठा मोर्चा काढला होता. हा मोर्चा सोमवारी इस्लामाबादला पोहोचेल आणि विरोधकांच्या रॅलीत सामील होईल.

Post a Comment

0 Comments