सोलापूर! शहरात वावरत असतांना तडीपार इसमास पोलिसांनी घेतले ताब्यात


सोलापूर :

तडीपार आदेशाचा भंग करुन सोलापुर शहरात वावरत असतांना तडीपार इसमास ताब्यात घेऊन एमआयडीसी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तडीपार इसम नामे मल्लिकार्जुन कल्लाप्पा आळगुंडगी वय-26 (रा.घर नं.163अविनाश नगर,एमआयडीसी सोलापूर) त्यास पोलीस उपआयुक्त (परीमंडळ) यांचेकडील तडीपार क्रमांक 34 आदेश क्र.3297/2021 दिनांक.12/10/2021रोजी पासुन दोन वर्षाकरीता सोलापुर शहर व जिल्हयातुन तडीपार करण्यात आलेले आहे.सदर तडीपार आदेशाचा अंमल चालु असताना पुर्व परवानगी शिवाय तडीपार आदेशाचा भंग करुन सोलापुर शहरात वावरत असतांना मिळुन आलेला आहे. म्हणुन फिर्यादी पोलीस नाईकनेभारत श्रीपती गायकवाड नेम एमआयडीसी पोलीस ठाणे यांनी दिलेल्या फिर्यादवरून तडीपार इसमाविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments