करमाळा तालुक्यातील निमगाव हवेली येथील एका नराधमाणे पारधी समाजातील महिलेवर जबरदस्तीने बलात्कार करून जातीवाचक शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली आहे. यावरून पिडीत महिलेने करमाळा येथील पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यावरून आरोपी समाधान रोहिदास नीळ याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.परंतु आरोपीस अद्यापही अटक केली नाही. सदरील गुन्ह्यांतील आरोपी समाधान रोहिदास नीळ व त्याचे नातेवाईक यांची गावात दहशत आहे. त्यांचे पासून पिडीत महिला व त्यांचे कुटुंबास धोका आहे.
त्यामुळे पिडीत महिलेच्या कुटुंबास पोलीस संरक्षण द्यावे व आरोपी समाधान रोहिदास नीळ यास तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी बहुजन परिषद महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष बिभीषण लोखंडे यांनी जिल्हा पोलीस प्रमुख सोलापूर यांच्या कडे केली आहे.
तसेच आरोपीचे गावातील नातेवाईक हे खुनशी व आरदांड प्रवृतीचे आहेत.या लोकांनी काल पिडीत महिलेच्या कुटुंबास होणारा पिण्याचा पाणी पुरवठा खंडित केलेलाआहे.गावात फिरून दहशत निर्माण करून पिडीत महिलेच्या कुटुंबास शिवीगाळ करत आहेत. त्यामुळे पुढील अनर्थ होऊ नये यासाठी आरोपीस तात्काळ अटक करावी अन्यथा बहुजन परिषदेच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.
0 Comments