तृतीयपंथी सपना बाळू सोबत विवाह बंधनात, बीडमध्ये थाटात पार पडला लग्न सोहळा



बीडमधील तृतीयपंथी सपना आणि ढोलकी वाजवणारा बाळू आज विवाह बंधनात अडकले आहेत. बीडमधील कंकालेश्वर मंदिरात सपना आणि बाळूचा मोठ्या धुमधडाक्यात विवाह सोहळा पार पडला आहे. 
 पारंपारिक धार्मिक विधीनुसार सपना आणि बाळूचा विवाह सोहळा पार पडला. संपूर्ण मंगलाष्टिका झाल्यानंतर बीडमधील पत्रकार आणि सामाजिक संस्थेमधील लोकांनी सपनाचं कन्यादान केलं. 

काल सपनाच्या घरी धार्मिक परंपरेनुसार हळदीचा सोहळा उत्साहात पार पडला. या हाळदीच्या सोहळ्यासाठी सपनाच्या घरासमोर मंडप उभारण्यात आला होता. याच मंडपात चौक भरला आणि या चौकावर सपना आणि बाळूला हळद लावण्यात आली होती. 

सपना आणि बाळूच्या प्रेम कहाणीचे राज्यभरातून कौतुक होत आहे. दोन वर्षांच्या प्रेमकहाणीनंतर सपना आणि बाळूने लग्न करण्याचा निर्णय घेतला. सपनाने तिच्या आयुष्यामध्ये कधीही तिला हळद लागेल असं स्वप्न बघितलं नव्हतं. परंतु, बाळूच्या साथीने काल सपनाला हळद लागली आणि आज ती बहोल्यावर चढली. आज सकाळी साडेअकरा वाजता बीड शहरातील ऐतिहासिक कंकालेश्वर मंदिर परिसरात सपना- बाळू विवाह बंधनात अडकले आहेत. 

Post a Comment

0 Comments