सोलापूर/प्रतिनिधी:
करमाळा तालुक्यातील जातेगाव हद्दीत विदेशी मद्याची वाहतूक करणा-या ट्रकला अपघात झाला आहे अशी संगनमत करुन अहमदनगर जिल्ह्यात अवैधरीत्या विक्री केलेला विदेशी दारूचा ४० लाख रुपयांचा मुद्देमाल सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाने २६ फेब्रुवारी रोजी हस्तगत केला आहे.याबाबत अधिकृत माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी दिली आहे.
विदेशी दारूचा साठा अर्थानी ट्रेडर्स सोलापूर कडे येत होता-
२३ फेब्रुवारी रोजी युनायटेड स्पिरीट लि.( पारमोरी ता. दिंडोरी जि. नाशिक या विदेशी मद्य निर्माणी कंपनी मधून विदेशी मद्याचा साठा दहाचाकी ट्रक वाहन क्र. MH-15/B.J-3733 मधून सोलापूर जिल्ह्यातील अर्तानी ट्रेडर्स या विदेशी मद्य ठोक विक्री व्यपऱ्यहकडे येत होता. ट्रकचा मालक, चालक व इतर साथिदारांनी अपघात बनाव करुंन सोलापुरात आणण्यापूर्वीच ५९५ दारूच्या पेट्या अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील दामू जाधव यास अवैधरीत्या विक्री केली होती.
सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर अपघाताचा बनाव करून गाडी पलटी केली-
सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवरील करमाळा तालुक्यातील जातेगाव हृद्दीत अपघाताचा बनाव रचून ट्रक रस्त्याच्या डाव्या कडेला पलटी केला. वाहनातून १८० मिलीच्या ३९८ बॉक्स व ५ बाटल्या सुस्थितीत व ०७ बॉक्स फुटलेल्या मिळून आल्या. सदर ठिकाणाची पाहणी केली असता तसेच सदर वाहनचालकाची चौकशी केली असता असमाधानकारक उत्तर मिळाल्याने त्याच्यावरील संशय वाढला. त्याची कसून चौकशी केली असता त्याने ५९५ बॉक्स हे त्याने त्याचे सदर गुन्ह्यातील इतर साथीदारांच्या • मदतीने घोडेगाव ता. नेवासा जि. अहमदनगर या गावात ठेवले असल्याची कबुली दिली.
एका पत्र्याच्या शेड मधून मुद्देमाल हस्तगत-
संशयीत आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क सोलापूरचे अधिकारी व कर्मचा-यांनी घोडेगाव ता. नेवासा जि. अहमदनगर या ठिकाणी असलेल्या दामु जाधव याच्या मालकीच्या पत्र्याच्या शेडमध्ये तपासणी केली.त्यामध्ये ५२७ विदेशी मद्याचे बॉक्स ठेवल्याचे दिसून आले. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ४० लाख ४७ हजार ३६० रुपये किंमतीची विदेशी दारु व दोन मोबाईल जप्त केले असून वाहनचालक जहिर रफिक अत्तार, (वय ४९ वर्ष रा.नाशिक) व विष्णु मधूकर डमाळे (वय ४२ वर्ष रा. ईमामशाही कोळीवाडा नाशिक) यांना अटक केली आहे. ट्रक मालक गुलाम महमद अन्सारी, (रा. नाशिक) व दामू जाधव (रा. घोडेगाव ता. नेवासा जि. अहमदनगर) हे फरार असून त्यांचा शोध सुरु आहे.
ही कारवाई यांनी पार पाडली-
उपअधीक्षक आदित्य पवार, निरिक्षक मुळे, कदम, दुय्यम निरिक्षक आवताडे, शंकर पाटील, एस.ए. पाटील, शेख, भरते व सहायक दुय्यम निरिक्षक होळकर, मुंडे व जवान कर्मचारी लुंगसे, कचे, वडमिले, सावंत, वाहनचालक मिसाळ, वाघमारे, रशीद शेख यांनी केली. तसेच सदर कारवाई दरम्यान अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गणेश पाटील व नगर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी कर्मचा-यांनी सहकार्य केले. सदर गुन्ह्याचा पुढील तपास भरारी पथकाचे निरिक्षक सुनिल कदम हे करीत आहे.
0 Comments