सोलापूर! एमआयएम' बिर्याणीच्या नावावर लोकांना फसवते


सोलापूर/प्रतिनिधी:

महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे अध्यक्ष आमदार डॉ वजाहत मिर्झा हे सोलापूर दौऱ्यावर असून काँग्रेस भवनात शहर व जिल्हा अल्पसंख्याक विभागाच्या वतीने त्यांचा आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार प्रकाश यलगुलवार होते. 

शहराध्यक्ष प्रकाश वाले, नगरसेवक बाबा मिस्त्री, नगरसेवक रियाज हुंडेकरी, विश्वनाथ चाकोते,  नगरसेवक तथा अल्पसंख्याक शहराध्यक्ष तौफिक हत्तुरे,नगरसेविका फिरदोस पटेल, जिल्हाध्यक्ष आरिफ पठाण, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी,आरिफ शेख, शकील मौलवी, हासीब नदाफ, रुस्तुम कंपली, झुबेर कुरेशी,वाहिद बिजापुरे, मन्सूर गांधी यांच्यासह मुस्लिम समाजातील काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉक्टर वजाहत मिर्झा म्हणाले, आगामी महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्या प्रत्येक मुस्लिम कार्यकर्त्याने तयार राहायला हवे. एमआयएमचे नाव न घेता ते म्हणाले, शेजारच्या काही पार्टी येतात बिर्याणीच्या नावाखाली मुस्लिम समाजाला फसवतात आता, त्यांची बिर्याणी नको तर मुलांच्या भविष्यासाठी विचार करण्याची गरज आहे. एमआयएमचा जर तुम्ही अभ्यास केलात तर स्वतःच्या राज्यांमध्ये केवळ सात विधानसभा ते लढवतात मात्र उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र मध्ये किमान 100 जागा लढवल्या जातात या मागचा त्यांचा उद्देश काय? तर तो केवळ मतांचे विभाजन हाच त्यांचा उद्देश असून एमआयएम पासून मुस्लिम समाजाने आत्ताच सावधान व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

डॉ मिर्झा पुढे म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वक्‍फ बोर्डाच्या सुमारे 97 हजार एकर जमिनी आहेत, त्यात 40 टक्के अतिक्रमण झाले आहे, या सर्व जमिनीचा रेवेन्यू जर आला तर मुस्लिम समाजाच्या कल्याणासाठी महाराष्ट्र सरकारच्या कोणत्याही निधीची गरज पडणार नाही. वक्फ बोर्डाच्या जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे, मात्र या विभागाकडे मनुष्यबळ कमी आहे याची जाणीव जेव्हा आम्ही महाराष्ट्र सरकारला करून दिली तेव्हा 180 जागा भरण्यासाठी सरकारने मंजुरी दिली आहे. आता वक्फ बोर्डाच्या कोणत्याही कामासाठी राज्यातून कुणालाही  औरंगाबादला जाण्याची गरज पडणार नाही सर्व नोंदणी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे, नोंदणी असेल चेंज रिपोर्ट असेल हे सर्व ऑनलाईन सबमीट करण्याची सोय आम्ही करत आहोत. याचबरोबर राज्यांमध्ये क्‍फ बोर्डाच्या विभागीय कार्यालय आणि जिल्हास्तरीय कार्यालयांना मंजुरी मिळाली असून सोलापुरात लवकरच या कार्यालयाचा शुभारंभ आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करणार असल्याची माहिती डॉक्टर मिर्झा यांनी दिली.

Post a Comment

0 Comments