पांगरी:
स्व.शोभाताई सोपल सेमी इंग्लिश स्कूल, पांगरी येथे आज १९ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती ही बाल शिव उत्सव म्हणून साजरी करण्यात आली.
प्रथम महाराष्ट्राचे आद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्यदिव्य मूर्तीला कार्यक्रमाचे पाहुणे मॅनेजर (HDFC bank) अतिष गायकवाड, शंकर गायकवाड कार्यक्रमाचे अध्यक्ष पत्रकार बाबा शिंदे व बिभीषण गरड यांच्या हस्ते पुष्पहार घालून पूजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमास अतिष गायकवाड, शंकर गायकवाड, बाबा शिंदे, बिभीषण गरड, संस्थाध्यक्ष विनायक गरड आणि शाळेतील सर्व स्टाफ व इतर कर्मचारी आणि शाळेतील बाल शिव विद्यार्थी, जिजाऊ विदयार्थी व मावळे विदयार्थी उपस्थित होते.
उपस्थित पाहुण्यांचा आदरसत्कार झाल्यावर विदयार्थी शिव जन्म उत्सव भाषण व मान्यवरांचे शिव मार्गदर्शन झाले. खूपच उत्सवार्धक वातावरणात बाल शिव उत्सव साजरा झाला. कार्यक्रमास सविता मॅडम, निवेदिता मॅडम, अश्विनी मॅडम, शिल्पा मॅडम यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाटील सर यांनी केले व आभार प्रदर्शन गरड सर यांनी केले.
0 Comments