वैराग उस्मानाबाद एसटी सुरू करण्याबाबत बसपाचे निवेदनवैराग/प्रतिनिधी:

वैराग ते उस्मानाबाद भातंबरे मार्गे एसटी चालू करणेबाबत बहुजन समाज पार्टी तर्फे बार्शी आगारप्रमुख श्रीमती मिसाळ व वैराग वाहतूक नियंत्रण कक्ष यांना निवेदन देण्यात आले.

कोविड सारख्या महामारीमध्ये आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सर्वसामान्यांचे जीवन कोलमडले असता आत्ता बऱ्यापैकी गड्या जाऊ लागले आहेत, परंतु शालेय विद्यार्थी व जुनोनी मार्गे उस्मानाबाद करणाऱ्या नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे यामुळे बहुजन समाज पार्टी बार्शी विधानसभा यांच्यातर्फे उस्मानाबाद जुनोनी व भातंबरे मार्गे लवकरात लवकर एसटी बस चालू करावी, अशी मागणी करण्यात येत आहे सदरची मागणी लवकरात लवकर करण्या चे निवेदन बहुजन समाज पार्टी तर्फे करण्यात येत आहे. 
यावेळी बहुजन समाज पार्टीचे जिल्हा कोषाध्यक्ष विलास शेरखाने, सचिव कांतीलाल भोसले, तसेच वैरागचे शहराध्यक्ष ताजुद्दीन शेख, वडार भाईचारा अध्यक्ष परमेश्वर जी जाधव बार्शी विधानसभा सदस्य सतीश जी डोळसे, त्याचबरोबर बार्शी शहर कोषाध्यक्ष अक्षय बोकेफोडे, नागेश ठोंबरे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments