सोलापूर/प्रतिनिधी:
अंध महिलेला अन्नधान्य वाटप करत आहेत,चल असे सांगितले आणि विजापूर वेस येथे घेऊन गेले.अंध महिलेला तेथेच सोडून त्याच्या त्याच्या रखवालीत असलेल्या तीन वर्षीय मुलाला घेऊन पसार झाले.याबाबत अंध महिलेच्या बहिणीच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
यात हकीकत अशी की, सिध्दार्थ सोसायटी पासून ते विजापूर वेस या दरम्यान हा गुन्हा घडला आहे. दरम्यान फिर्यादीच्या अंध बहिण अंबिका ऊर्फ रेशमा हिला अज्ञात आरोपी महिलेने विजापूर वेस येथे अन्नधान्य वाटप करत आहेत असे आमिष दाखवून त्यास मुलासह विजापूर वेस येथे घेवून जावून गेले. तेथे जाऊन अंध महिला अंबिका उर्फ रेश्मा याला तेथेच सोडून तिच्या रखवालीतील असलेला तीन वर्षीय मुलाला कोणास काही न सांगता फुस लावून घेवून गेली आहे. अशी फिर्याद अज्ञात महिलाविरुध्द सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सावंत हे करत आहे .
0 Comments