बार्शी! 'रस्त्यावर कचरा टाकू नका' म्हटले बेदम मारहाण; तीन तोळे सोने लांबवले; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल


बार्शी/प्रतिनिधी:

बार्शी तालुक्यातील माळेगाव येथे रस्त्यावर कचरा टाकू नको असे सांगितले म्हणून एकास काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे दोघांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तानाजी शंकर पवार (वय ४१) रा. मळेगाव ता. बार्शी रस्त्यावर व रस्त्याच्या बाजूला कचरा टाकू नको असे म्हटले म्हणून २८ फेब्रुवारी रोजी दुपारी बाराच्या दरम्यान दोघांनी मिळून एक झालास बेदम मारहाण केली आहे. दगडाने व काठीने मारहाण केली आहे या भांडणांमध्ये फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची दोन तोळ्यांची चेन व बोटातली एक तोळ्याची अंगठी काढून घेतली आहे व फिर्यादी व त्यांच्या वडिलांना शिवीगाळ करत ते दोघे निघून गेले आहेत, त्यामुळे संदीप तुकाराम कदम (वय ३२) विनोद तुकाराम कदम (वय ३४) रा. मळेगाव यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम ३२३,३२४,३२७,३४,५०४,५०६ या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, या घटनेचा अधिक तपास पोलिस नाईक केकान करत आहेत.

Post a Comment

0 Comments