इंदुरीकर महाराज राज्यभरात त्यांच्या विशिष्ट शैलीतील कीर्तनासाठी प्रसिद्ध आहेत. मात्र त्यांच्या याच प्रसिद्धीचा गैरफायदा काही जण घेत असल्याची तक्रार खुद्द इंदुरीकर महाराज यांनीच अहमदनगरचे जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली आहे.
या संदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षकांनी सांगितले की, इंदुरीकर महाराज यांनी त्यांच्या कीर्तनाच्या ध्वनीचित्र फिती बनवण्याचे अधिकार एका कंपनीला दिले आहेत. मात्र ही कंपनी त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करत आहे, अशी तक्रार इंदुरीकर महाराज यांनी दिली आहे.
0 Comments