अक्कलकोटमध्ये कंबर कसली तर राष्ट्रवादीमय वातावरण होऊ शकते : ना. जयंत पाटील


राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या पाचव्या पर्वातील दुसऱ्या दिवशीची दुसरी सभा अक्कलकोट येथे पार पडली. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी अक्कलकोट मतदारसंघात पक्ष बलवान करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश दिले. कंबर कसली तर इथे राष्ट्रवादीमय वातावरण होऊ शकते. तसे प्रयत्न करा. पुन्हा येईन तेव्हा हे चित्र दिसले पाहिजे असे जयंत पाटील म्हणाले. या मतदारसंघाकडे पक्षाकडून पाहिजे तेवढे लक्ष दिले गेलेले नाही, मात्र आदरणीय शरद पवारसाहेबांच्या विचाराने कार्यकर्ते इथे काम करत आहेत, याचे कौतुक जयंत पाटील यांनी केले.

दरम्यान, अक्कलकोटला आठ दिवसाने पाणी मिळते, अशी समस्या महिलांनी मांडली. याबाबत आताच  सीईओशी बोललो आहे. ठेकेदारामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. मात्र त्या ठेकेदाराचे काम रद्द करा आणि नवीन ठेकेदार नेमा असे आदेश दिले आहेत, असेही जयंत पाटील यांनी सांगितले. पाण्याचा प्रश्न सोडवला गेलाच पाहिजे. तुमची पाण्याची सोय केली तर तुम्ही 'तू भिऊ नकोस आम्ही तुमच्या पाठीशी आहोत' असे स्वामींसारखे आशीर्वाद मला द्याल असेही ते म्हणाले. अक्कलकोटमधील कॅनालचा प्रश्नही तात्काळ सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासनही जयंत पाटील यांनी यावेळी दिले. 

दरम्यान, पाण्याचा प्रश्न तात्काळ सोडवल्याबद्दल उपस्थित महिलांनी यावेळी जयंत पाटील यांचे आभार मानले. 

या सभेला पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, निरीक्षक सुरेश घुले, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, माजी आमदार दिपकआबा साळुंखे, कार्याध्यक्ष उमेश पाटील, व्यापार व उद्योग प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे, तालुकाध्यक्ष दिलीप सिध्दे, शहराध्यक्ष मनोज निकम, माजी नगराध्यक्ष महानंदा स्वामी, अल्पसंख्याक अध्यक्ष वसिम बुरहाण, लतिफ तांबोळी, जिल्हा निरीक्षक दिपालीताई पांढरे, महिला जिल्हाध्यक्षा सुप्रियाताई गुंड, महिला कार्याध्यक्षा रंजना हजारे, तालुकाध्यक्षा मायाताई जाधव, विद्यार्थी विभागीय अध्यक्ष सुहास कदम आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments