जळगाव जिल्ह्यातील चोपडा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार लता चंद्रकांत सोनवणे यांची आमदारकी धोक्यात आली आहे. टोकरे कोळी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध घोषित केल्याचा निर्णय नंदुरबार अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने दिला आहे.
या आदेशात म्हटले आहे की, सोनवणे यांनी या कागदोपत्री पुराव्याच्या आधारे तसेच आता भाव संबंध परीक्षेच्या आधारे टोकरे कोळी अनुसूचित जमातीचा दावा त्या सिद्ध करू शकल्या नाहीत. त्यामुळे त्यांचा टोकरे कोळी अनुसूचित जमातीचा दावा अवैध घोषित केला आहे. तसेच त्यांनी अमळनेर उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर केलेले टोकरे कोळी अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र रद्द करून जप्त करण्यात येत आहे.
0 Comments