"हिजाब घालणारी मुलगी देशाची पंतप्रधान होईल”- असदुद्दीन ओवैसी



देशभरात सध्या ‘हिजाब’ वरून मोठा वाद सुरू आहे. मुस्लीम महिलांच्या पोशाखाचा भाग असलेल्या ‘हिजाब’ सध्या चर्चेत आहे. कर्नाटकच्या एका शाळेत हिजाब घातलेल्या मुलींना रोखण्यात आलं. त्यानंतर कर्नाटकमध्येच एका हिजाब घातलेल्या मुलीला कट्टरतावाद्यांच्या गटाने त्रास दिल्याचं दिसून आलं. हा व्हिडिओ देशभरात व्हायरल झाला.

त्यानंतर आता या प्रकरणाचे देशभरात पडसाद उमटताना दिसत आहेत. एमआयएमचे  अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये ते हिजाबचं समर्थन करताना मोठी वक्तव्य करताना दिसत आहेत.

मुलींच्या हिजाब घालण्याला समर्थन करताना ओवैसी यांनी हिजाब घालणारी मुलगी देशाची पंतप्रधान होईल असं म्हटलंय. “आमच्या मुलींनी ठरवलं हिजाब घालायचाय तर त्यांचं रक्षण करण्याचं काम आई वडील करतील. मुली हिजाब घालतील, कॉलेजला जातील, डॉक्टर, इंजिनीअर, कलेक्टर होतील. मी जिवंत असेल नसेल पण हे लक्षात ठेवा की, हिजाब घातलेली मुलगी देशाची पंतप्रधान असेल.”

हिजाब वरून निर्माण झालेल्या या वादाचे पडसाद देशातील वेगवेगळ्या राज्यांत उमटताना दिसत आहेत. कर्नाटकच्या मांड्या जिल्ह्यात हिजाब घातलेल्या मुस्कान खान या तरुणीला महाविद्यालयाच्या आवारात कट्टरतावादी तरुणांनी रोखलं होतं. त्यानंतर ती मुलगी न घाबरता त्या प्रसंगाला सामोरं गेली. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशभरातून यावर संतप्त प्रतिक्रीया आल्या. असदुद्दीन ओवैसी यांनी या घटनेनंतर ‘मुस्कान’शी फोनवरून बातचीत देखील केली होती.

Post a Comment

0 Comments