आम्ही भाऊ बहिण एकमेकांसाठी जीव देऊ शकतो - प्रियांका गांधी



उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राहुल गांधी व प्रियांका गांधी वाड्रा यांच्यात वर्चस्वाची लढाई सुरू असल्याची टीका केली होती. यावर प्रियांका गांधी  यांनी उत्तर देत म्हणाल्या, आम्ही दोघे भाऊ बहिण एकमेकांसाठी जीव देऊ शकतो. त्या पंजाब येथील आगामी विधानसभा निवडणूकीच्या प्रचारसभेत बोलत होत्या.

ती सरकार पंजाबमधून नाही तर दिल्लीतून चालवली जात होती. मात्र, ती काँग्रेसमार्फत नाही तर भाजपाकडून ती सरकार चालवली जात होती, अशा शब्दात प्रियांका गांधी यांनी पूर्व मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. ही अदृश्य युती समोर आल्यामुळे आम्हाला मुख्यमंत्री बदलावे लागले. सिंह यांनी सप्टेंबर महिन्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवजोत सिंह सिद्धू यांच्यासह झालेल्या वादानंतर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी पंजाब लोक काँग्रेस पक्षाची स्थापना केली.

 दिल्लीतून आलेला एक पक्ष दिल्ली मॉडेल दाखवून पंजाबमधील मतदारांची दिशाभूल करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात दिल्ली मॉडेलबाबत जाहिराती केल्या जात आहेत. पण, अशा जाहिरातींना बळी पडू नका. कारण, २०१४ केंद्रात आलेल्या भाजपनेही देशासमोर गुजरात मॉडेल ठेवले होते. मोठ्या प्रमाणात जाहिराती करण्यात आल्या. मात्र, झाले काय, असे म्हणत आपसह भाजपवरही प्रियांका गांधी यांनी टीका केली. पंजाब राज्यात २० फब्रुवारीला मतदान होणार असून १० मार्चला मत मोजणी होणार आहे.

Post a Comment

0 Comments