सोलापूर! अवैध वाळू वाहतूकसाठी पुष्पा चित्रपटाप्रमाणे नविन फंडा...


सोलापूर/प्रतिनिधी:

सोलापूर शहरामध्ये अवैध धंदयावर प्रभावी कारवाई करून त्यांचे समुळ उच्चाटन करणे बाबत पोलीस आयुक्त सोलापूर शहर  हरीष बैजल व पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा)  बापू बांग यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना आदेश दिले होते. त्या अनुषंगाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साळुंखे, यांचे मार्गदशना खाली अवैद्य धंदयावर प्रभावी छापा टाकुन कारवाई करण्याचे गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व कर्मचारी करीत आहेत.

त्याअनुषंगाने गुन्हे शाखेकडील पोलीस उप निरीक्षक श्री. संदीप शिंदे व त्यांचे पथकातील पोलीस कर्मचारी असे दि.२४/०२/२०२२ रोजी पोलीस आयुक्तालय हद्दीत अवैदय धंदयावर कारवाई करणे करीता पेट्रोलींग करीत असता फौजदार चावडी पो.स्टे हददीतील, गणेश नगर, बालाजी ब्ल्यु अर्पाटमेंन्ट पाठीमागे स्पर्श हॉस्पीटल ते मडकेवस्ती जाणाऱ्या रोडवरून टाटा कंपनीचा ४०७ टॅम्पो क्रमांक एम एच २९ टी ३८२४ हा जात असताना सदर टॅम्पो मधुन वाळु वाहतुक करीत असले बाबत त्यांना संशय आल्याने सदर टॅम्पो चेक केला.

सदर टॅम्पोचे मागील बाजुस अंदाजे एक ब्रास वाळु भरून टॅम्पो मधील वाळुचा कोणास संशय येऊ नये म्हणुन त्यावर कचखडी टाकलेली होती. त्यांचेकडे वाळु वाहतुकी बाबत व टॅम्पो बाबत कोणती ही कागदपत्र, शसनाची रॉयलटी व परवाना नसताना इसम नामे ०१) लक्ष्मण गणपती पवार वय-२९ वर्षे व्यवसाय - ड्रायव्हर, रा.घर नंबर ०२ रेणुका नगर, जुळे सोलापूर ०२) शिवराज बाबु घोडके वय २० वर्षे व्यवसाय-क्लिनर रा.घर नंबर ४७, रेणुका नगर, सोलापूर ०३) साईनाथ भैरण्णा भैरामडी वय-३० वर्षे व्यवसाय व्यापार रा. व्यंकटेश्वर चौक, ७६/२, निलमनगर, सोलापूर या इसमांनी चोरी करून वाळु वाहतुक करीत असताना मिळुन आले. त्यांचे ताब्यातील टॅम्पो व वाळु असा एकुण १,५८,०००/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर वाळु वाहतुक करणाऱ्या ०३ इसमां विरूध्द फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त, सोलापूर शहर हरीष बैजल, पोलीस उप आयुक्त (गुन्हे/विशा) बापु बांगर, वपोनि. (गुन्हे), सहा. पोलीस आयुक्त श्रीमती टिपरे, 
संजय साळुंखे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक संदीप शिंदे, अजय देवराम पाडवी, तात्यासाहेब पाटील कुमार शेळके, महेश शिंदे यांनी पार पाडली.

Post a Comment

0 Comments