बार्शी! फडणवीसांच्या विधानाचा मुस्लीम युवकांकडून निषेध, तहसीलदारांना निवेदन


बार्शी - शहरातील काही मुस्लिम युवक आणि उडान फाऊंडेशनच्या सदस्यांनी भाजप नेते आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. या युवकांनी फडणवीस यांची प्रतिमा जाळून शहीद हजरत टीपू सुल्तान यांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. तर, तहसीलदार यांना निवेदनही देण्यात आलं. 

शहरातील शाहीर अमर शेख चौकात मोहसीन तांबोळी, शाहबाज शेख, इब्राहिम शेख, अमन शेख, सज्जाद शेख आदींनी या निषेध आंदोलनात सहभाग घेतला होता. यावेळी, मोहसीन तांबोळी म्हणाले की, फडणवीस यांनी अगोदर टीपू सुल्तान यांच्या कार्याचा अभ्यासा करावा, माहिती घ्यावी मगच आपले विचार मांडावेत. फडणवीस यांच्या वक्तव्यामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे, यापुढे फडणवीसांना बार्शी तालुक्यात आम्ही पाय ठेऊ देणार नाही, असा इशाराही आंदोलकांनी दिला. तर, उडान फाऊंडेशनच्यावतीनेही फडवणीस यांच्या विधानाचा निषेध नोंदविण्यात आला. तसेच, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन बार्शीचे तहसीलदार यांना देण्यात आले. 

दरम्यान, “ज्या टिपू सुलतानने हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले, तो टिपू सुलतान आमचा देशगौरव होऊ शकत नाही. त्यामुळे त्याचं नाव मुंबई महापालिकेने मैदानाला देणं अतिशय अयोग्य आहे. हे एकप्रकारे अत्याचार करणाऱ्याचा महिमा करण्याचं काम केलं जातंय. त्यामुळे जो निर्णय घेण्यात आलाय तो रद्द केला पाहिजे,” असं विधान फडणवीस यांनी केलं होतं.

Post a Comment

0 Comments