सोलापूर! झोपेची डुलकी लागल्याने कार झाडावर आदळली; तिघांचा जाग्यावर मृत्यू


सोलापूर/प्रतिनिधी:

झोप लागल्याने स्कॉरपीओ गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ती झाडाला धडकली. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रवीवार (दि. 16 जानेवारी) रोजी घडली. ही घटना सोलापूर विजयपूर रोडवर तेरामैल औराद परिसरात घडली. किशोर अण्णाराव भोसले (वय वर्षे 45, राहणार सळई मारुती, उत्तर कसबा सोलापूर), नितीन भगवान भांगे (वय 32 रा. निराळे वस्ती सोलापूर), व्यंकटेश राम म्हेत्रे (वय 45 रा. मोदी सोलापूर) अशी मृतांची नावे आहेत.

सोलापूर विजयपूर महामार्गवरील तेरा मैल याठिकाणी रविवारी पहाटे पावणे चारच्या सुमारास (एम.एच.13 झेड 9909), स्कॉर्पिओ गाडीतून औराद ते सोलापूर येथे येत असताना तेरा मैल जवळ वकील वस्ती येथे झाडाला गाडी धडकल्याने तिघेही जखमी झाले. उपचारासाठी त्यांचा मित्र संभाजी जुगदार याने त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

नितीन भांगे ही व्यक्ती प्रसिद्ध अशी मंडप कॉन्ट्रॅक्टर आहे. आणि किशोर भोसले व व्यंकटेश म्हेत्रे हे लाईट डेकोरेशनचे काम करतात. औराद येथे मंडप व लाईट डेकोरेशनच्या कामानिमित्त गेले होते. पण पहाटेच्या सुमारास काळाने त्यांवर घाला घातला. तिघांचा जाग्यावरच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच मृतांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.

Post a Comment

0 Comments