पत्नीचे नोकरासोबत अवैध संबंध; व्यावसायिकाची विष पिऊन आत्महत्या


एका व्यावसायिकाने घरगुती वादातून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सदर व्यावसायिकाच्या पत्नीचे नोकरासोबत अवैध संबंध होते. त्यातूनच ही घटना घडल्याचं समजत आहे. राजस्थानमधील चूरूमध्ये शनिवारी रात्री ही घटना घडली. व्यावसायिकाने विष पिऊन आपलं जीवन संपवलं. 

सादुलपूर पोलिसांनी सांगितलं की, वॉर्ड नंबर 9 चे निवासी पायल भरतियाने दिलेल्या माहितीनुसार, तिची आई राधिकेच्या मृत्यूनंतर वडील राजकुमारने तिची मावशी रेणूसोबत दुसरं लग्न केलं. लग्नाच्या काही वर्षांपर्यंत सर्व व्यवस्थित सुरू होतं. नंतर मात्र तिची सावत्र आई रेणूच्या वडिलांसोबत भांडण करू लागली. मुलीची दुसरी मावशी मीना त्यांच्या घरी येत-जात होती. सावत्र आई वडिलांना न सांगता मीना मावशीला पैसे देत असल्याचं मुलीने सांगितलं. साधारण 7 महिन्यांपूर्वी सावत्र आईने मावशीला तब्बल 20 लाख रुपये आणि सोने-चांदीचे दागिने दिली होते. यावरुन आई-वडिलांमध्ये जोरात भांडण झालं.

पायलने सांगितलं की, भांडणानंतर आईने माझ्यासह एक बहीण आणि एका भावाला घेऊन दुसऱ्या मावशीकडे निघून गेली. यानंतर आम्ही आजोळी निघून गेलो. त्यानंतर काही दिवसांनी आई पुन्हा घरी परतली. पायलने या प्रकरणात आरोप केला आहे की, घरकाम करणाऱ्या राहुल नावाच्या तरुणासोबत आईचे अवैध संबंध होते. याबद्दल वडिलांना कळताच त्यांनी राहुलला कामावरुन काढून टाकलं. यानंतर सावत्र आई राहुलला कामावर ठेवण्यासाठी दबाव आणत होती. वडिलांनी विरोध केल्यानंतरही ती वडिलांना त्रास देत होती. यामुळे त्रस्त झालेल्या वडिलांनी आत्महत्या केली. पोलीस या प्रकरणात तपास करीत आहे.

Post a Comment

0 Comments