ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर निवडणूक आयोगाने ओबीसी जागांच्या निवडणुका रद्द केल्या आहेत. मात्र, ओबीसी जागांच्या निवडणुका रद्द न करता सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रद्द कराव्यात, अशी मागणी भाजपने केली आहे.
राज्यातील 106 नगरपंचायती, भंडारा - गोंदिया येथील जिल्हा परिषदा आणि त्यांच्या अंतर्गत असलेल्या 15 पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी जागांवरील निवडणूक प्रक्रिया स्थगित केली आहे. मात्र, यामुळे एक मोठा वर्ग मतदानापासून वंचित राहत असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वच जागांवरील निवडणुका पुढे ढकलाव्यात, अशी मागणी भाजपने आज राज्य निवडणूक आयुक्त युपीएस मदान यांच्याकडे केली.
0 Comments