'हा' तर रांझ्याचा पाटील, त्यांची मंत्रीपदावरून कधी हकालपट्टी करणार?


जळगावमधील प्रचारसभेत शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील  यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यावरून आता गुलाबराव पाटील यांच्यावर टीका होताना दिसत आहे. अशातच आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर कडाडून टीका केली आहे.

“शिवसेनेच्या नेत्यांना झालंय काय? संजय राऊतानंतर आता गुलाबराव पाटील त्यांनी हेमा मालिनीबद्दल बेताल वक्तव्य केलं आहे. गुलाबराव पाटील-रांझ्याचा पाटील वृत्ती तीच आहे. महाराजांनी त्याची पाटीलकी काढून घेतली. मग आता गुलाबरावाची मंत्रीपदावरून हकालपट्टी कधी होणार?”, असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.

जळगावमधील प्रचारसभेत बोलताना गुलाबराव पाटील यांनी, ‘हेमा मालिनी यांच्या गालासारखे सुंदर रस्ते आम्ही तयार केले आहेत’, असं वक्तव्य केलं होतं. जळगावमधील रस्ते दिसले नाहीत तर राजीनामा देईन, असंही गुलाबराव पाटील म्हणाले होते. त्यावरून चित्रा वाघ यांनी टीकास्त्र सोडलं आहे.

Post a Comment

0 Comments