तहसीलदारला २५ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले


चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्याचे तहसीलदार डॉ. निलेश खटके यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 25 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे.

तहसीलदार खटके यांनी लालमातीच्या उत्खननासाठी 25 हजार रुपयांची लाच मागितली होती. मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने अर्जदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंध कार्यालय गाठले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून तहसीलदाराला रंगेहात पकडले आहे. 

भद्रावती येथे अर्जदाराची वीट भट्टी होती, त्यावेळी भरतीसाठी लाल माती लागते. मातीच्या उत्खननासाठी रितसर परवाना मिळावा म्हणून तहसील कार्यालयाकडे अर्ज केला होता. परंतु माती उत्खननासाठी परवानगी हवी असेल तर पंचवीस हजार रुपये द्यावे लागतील असे आठ मांडली. सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईमुळे महसूल कर्मचाऱ्यांमध्ये  खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments