वैराग नगरपंचायत!... अन्यथा 50 हजार रुपये दंड गुन्हा दाखल होणार - प्रांताधिकारी हेमंत निकम


बार्शी/प्रतिनिधी;

वैराग नगरपंचायत निवडणुकीसाठी बुधवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असली, तरी पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही. निवडणूक प्रक्रिया संबंधात कोरोना महामारीचे सर्व नियम पाळणे सक्तीचे असून मोडणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी दिले आहेत.

निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत निकम बोलताना म्हणाले, 1 ते 7 डिसेंबर या कालावधीत अर्ज भरण्याची मुदत आहे चार व पाच डिसेंबरला सुट्टी आहे. उर्वरित पाच दिवस आज खरेदी करताना अथवा भरताना कोरोनाचे नियमाचे पालन करावे लागेल, निवडणूक कक्षात उमेदवारांसह एकूण पाच जणांना प्रवेश देण्यात येईल. वैराग नगरपंचायत निवडणूक पहिला घास होत आहे त्यामुळे प्रांताधिकारी हेमंत निकम व मुख्याधिकारी विना पवार या विशेष लक्ष देऊन कामगिरी करत आहेत. 

अपक्ष उमेदवार 5 तर राजकीय पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला 1 सूचक आवश्यक आहे अर्ज भरताना जात पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक आहे. राखीव उमेदवारास 500 तर सर्वसाधारण उमेदवारास 1000 अनामत रक्कम भरावी लागणार आहे. आठ डिसेंबर रोजी अर्जाची छाननी होऊन 13 डिसेंबर रोजी अर्ज मागे घेण्याची मुदत वचन वाटप आणि की 21 डिसेंबरला मतदान व 22 डिसेंबरला मतमोजणी होणार असून जाहीर सभा ही मर्यादा असल्याची माहिती त्यांनी दिली.

Post a Comment

0 Comments